जिल्हा न्यायालयाबद्दल
१८६० मध्ये ब्रिटिश सरकारने धुळे जिल्हा न्यायालयाची स्थापना केली. धुळे येथे जिल्हा न्यायालय स्थापन करण्यापूर्वी ऑर्थर सेंट गॉर्ज रिचर्डसन हे या प्रदेशातील न्यायिक कामकाज पाहत होते. माननीय न्यायमूर्ती श्री. महादेव गोविंद रानडे यांनी १८८० ते १८८१ या काळात धुळे येथे सहाय्यक न्यायाधीश म्हणूनही काम केलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा न्यायालयाला भेट दिलेली आहे. धुळे जिल्हा पूर्वी खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. प्राचीन काळी याला रसिका म्हणून ओळखले जात होते. नंतर, यादवांच्या काळात, त्यावर राज्य करणाऱ्या राजा सेनुचंद्राच्या नावावरून याला सेनुदेसा असे संबोधण्यात आले. मुस्लिमांच्या आगमनाने, फारुकी राजांना देण्यात आलेल्या खान या उपाधीच्या अनुषंगाने हे नाव बदलून खानदेश करण्यात आले. खान्देशातील संपूर्ण क्षेत्रामध्ये दोन जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामध्ये धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग होता. त्याचे मुख्यालय धुळे येथे होते. तथापि, १९०६ मध्ये प्रशासकीय कारणास्तव, खान्देशचे पश्चिम खान्देश आणि पूर्व खान्देश या दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. धुळे येथे मुख्यालय असलेल्या पश्चिम खान्देश जिल्ह्यात धुळे, नंदुरबार, नवापूर पेठ, पिंपळनेर, शहादा, शिंदखेडा, तळोदा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.
१९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह, पश्चिम खान्देशचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला आणि त्यानंतर १९६० मध्ये तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला. १९६१ मध्ये जिल्ह्याचे नाव पश्चिम खान्देश ऐवजी बदलुन धुलिया आणि नंतर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय धुळे[...]
अधिक वाचाकोणतीही पोस्ट आढळली नाही